ओझरला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:59 IST2020-12-18T20:10:02+5:302020-12-19T00:59:34+5:30

ओझर टाऊनशिप : एका तरुणाने त्याच्या राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. गुरुवारी (दि.१८) दुपारी तीन वाजेपूर्वी ही घटना घडली.

Ozar commits suicide by strangling a young man | ओझरला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ओझरला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ओझरच्या तांबट गल्लीत राहणाऱ्या योगेश उत्तम सोनवणे (२४) या तरुणाने राहत्या घरातील किचनमधील खिडकीला दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेचे वृत समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पिंपळगाव रुग्णालयात पाठविला. दरम्यान योगेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार के. डी. यादव करीत आहेत.

Web Title: Ozar commits suicide by strangling a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.