ओझरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 23:07 IST2022-01-20T23:06:08+5:302022-01-20T23:07:18+5:30
ओझरटाऊनशिप : मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाही, सकाळी बघू असे सांगितल्याने एका तरुणाने घराशेजारील शेडमधील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली.

ओझरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या
ओझरटाऊनशिप : मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाही, सकाळी बघू असे सांगितल्याने एका तरुणाने घराशेजारील शेडमधील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली.
मंगळवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सूरज ज्ञानेश्वर पगार (२४. रा. सायखेडा रोड, गंगापूर कॅनॉल, ओझरशिवार) हा गावातून नशेत आला व मला आताच्या आता नवा मोबाईल घेण्यासाठी पैसे द्या असे वडिलांना म्हणाला असता, सकाळी बघू असे वडिलांनी सांगितल्याने सूरज याने घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी पाईपला दोरी बांधून त्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत.