आॅक्सिजन, औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:41 IST2020-09-23T23:27:55+5:302020-09-24T01:41:37+5:30
नाशिक: आॅक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी दिल्या आहेत. जिल्'ातील कोरोना रुग्णांकरिता आॅक्सिजनचा आणि औषध पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

आॅक्सिजन, औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल
नाशिक: आॅक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी दिल्या आहेत.
जिल्'ातील कोरोना रुग्णांकरिता आॅक्सिजनचा आणि औषध पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
गटाच्या मागील बैठकीत नेमून दिलेल्या कामाची सद्यस्थिती सादर करणेबाबत संबंधित सदस्यांना जिल्हाधिकारी मांढरे यांनी सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सर्व सदस्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या बैठकीत सादर केला. जिल्'ातील कोविड रुग्णांसाठी आज रोजी दररोज 3 हजार 801 आॅक्सिजनच्या जम्बो सिलिंडरची मागणी असून जिल्'ातील आजचा पुरवठा हा 5 हजार 571 जम्बो सिलेंडर इतका आहे. याबाबतची माहिती संबंधित महापालिका व नगरपालिका यांचेकडून संकलित केली असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी यावेळी सांगितले. जिल्'ात आॅक्सिजनचा पुरवठा हा जिल्'ात रुग्णालयांना पुरेसा असून रुग्णांसाठी आवश्यक असणाºया रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरविणाºया स्टॉकिस्टकडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन माधुरी पवार यांना सूचना दिल्या असून त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वाहनही अधिग्रहीत करून पुरवण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी सदर औषधाचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याबाबत सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक संचालक माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे आदी उपस्थित होते.