नाशिक : येथील उंटवाडी-सिटीसेंटर मॉलच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास निशाचर पक्षी घुबड खाद्यासाठी रस्त्यावर उतरले असता अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत घुबडाचे प्राण वाचले; मात्र गंभीर जखमी झाल्याने घुबड जायबंदी झाले.अपघातानंतर सुमारे पंधरा मिनिटे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. दरम्यान, दुचाकीस्वार तरूणांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अत्यवस्थ अवस्थेत रस्त्यावर थंडीत कुडकुडणाºया घुबडाला उचलले व एका खोक्यात ठेवत पक्षी व वन्यजीव रेस्क्यू संस्थेसोबत संपर्क साधला. तत्काळ ‘इको-एको’ संस्थेच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेतील घुबडाला ‘रेस्क्यू’ केले. घुबडावर सकाळी पशुवैद्यकिय दवाखान्यात उपचार केले असता पाय फ्रॅक्चर झाले असून पंखांनाही जखम झाल्याने ते उड्डाण घेऊ शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.एकूणच रस्त्यावरून भरधाव वेगाने बेदरकारपणे वाहने चालविल्यामुळे माणसांचाही जीव धोक्यात येत आहे. दररोज विविध भागांमध्ये वाहनांच्या धडकेत माणसे जखमी किंवा मृत्यू होण्याच्या घटना घडत असताना आता रात्रीच्या वेळी पक्ष्यांवरही मृत्यू ओढावू लागला आहे.
नाशिकमध्ये अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत घुबड गंभीर जखमी; उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 14:22 IST
नाशिक : येथील उंटवाडी-सिटीसेंटर मॉलच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास निशाचर पक्षी घुबड खाद्यासाठी रस्त्यावर उतरले असता अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत घुबडाचे प्राण वाचले; मात्र गंभीर जखमी झाल्याने घुबड जायबंदी झाले.अपघातानंतर सुमारे पंधरा मिनिटे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. दरम्यान, दुचाकीस्वार तरूणांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अत्यवस्थ अवस्थेत ...
नाशिकमध्ये अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत घुबड गंभीर जखमी; उपचार सुरू
ठळक मुद्देघुबड खाद्यासाठी रस्त्यावर उतरले असता अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. ‘इको-एको’च्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेतील घुबडाला ‘रेस्क्यू’ केले.