शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक : नाशकात मनपा कर्मचाऱ्याकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग; झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 22:10 IST

कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे.

ठळक मुद्देसंशयित शिंदे याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा

नाशिक : राज्यात विविध ठिकाणी कोरोनाबाधित महिला रुग्णांसोबत घडलेल्या लाजिरवाण्या घटनांमुळे महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असताना शहरातील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयातील मनपाच्या एका सफाई कर्मचा-याने येथे उपचार घेणाºया महिला रुग्णाला स्वच्छतागृहाजवळ स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित कर्मचा-याविरुध्द डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात मंगळवारी (दि.६) दुपारच्या सुमारास कोरोनाबाधित महिला रुग्ण नैसर्गिकविधीकरिता स्वच्छतागृहात गेली असता संशयित संशयित मनपा कर्मचारी कैलास बाबुराव शिंदे (५६,रा.जुने नाशिक) याने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर बाहेरून लाथ मारून महिला रुग्ण आतमध्ये असतानासुध्दा लघवी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या महिलेने आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यानंतर शिंदे याने घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांनी मनपाचे डॉक्टर बेडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित शिंदे याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला. दरम्यान, घटनेनंतर संशयित शिंदे हा फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजनकुमार सोनवणे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरिक्षक इंगोले हे करीत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMolestationविनयभंगWomenमहिलाChitra Waghचित्रा वाघ