उड्डाणपुलाचा घाट घातल्यास आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:13 IST2020-12-25T04:13:41+5:302020-12-25T04:13:41+5:30

सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकदरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे . यामुळे अनेकांचा व्यापार जाईलच ...

Outcry over flyover | उड्डाणपुलाचा घाट घातल्यास आक्रोश आंदोलन

उड्डाणपुलाचा घाट घातल्यास आक्रोश आंदोलन

सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकदरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे . यामुळे अनेकांचा व्यापार जाईलच पण त्यांच्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार बेरोजगार होणार आहेत. या पुलामुळे सर्व सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. उड्डाणपुलाचा अट्टाहास करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात याआधी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांखाली काय उद्योग चालतात हे समोर दिसत असताना पूल बांधण्याचा उद्देश तरी काय, असा प्रश्नही घाटे यांनी यावेळी उपस्थित केला. मनपा प्रशासनाने हट्ट धरलाच तर व्यापाऱ्यांसह आक्रोश आंदोलन छेडले जाईल, असा इशारा घाटे यांनी दिला. यावेळी आशिष शुक्ल, बाळकृष्ण बोरकर, नाना ठाकरे, संदीप जैन, मनीष जैन, सागर पोटे, बाबा सावंत , विनायक वाघमारे, हनुमान कुलकर्णी आदी उपस्थित होते .

Web Title: Outcry over flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.