मनमाडला ‘समता दौड’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:12 IST2019-04-11T23:11:31+5:302019-04-11T23:12:41+5:30
मनमाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१९ या उपक्रमाचा शुभारंभ ‘समता दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू निकिता काळे हिने स्पर्धेचे उदघाटन केले.

मनमाड येथे भीमोत्सव २०१९ अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांसमवेत समितीचे राजेंद्र पगारे, प्रकाश बोधक, अनिल निरभवणे, संजय कटारे, प्रवीण व्यवहारे, फिरोज शेख, दिवाकर दोंदे, हेमंत कातकाडे आदी.
मनमाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१९ या उपक्रमाचा शुभारंभ ‘समता दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू निकिता काळे हिने स्पर्धेचे उदघाटन केले.
शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारांचे अनुयायी असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत ना पावती ना वर्गणी या तत्त्वावर आपल्या स्वत:चे पैसे जमा करून एक आगळीवेगळी भीमजयंती साजरी करतात. त्यानुसार भीमोत्सव २०१९ या उपक्रमाचे ११ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात खुल्या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आली. मालेगाव नाका चौफुली येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. पाच किमी अंतर असलेल्या 'समता दौड' मॅरेथॉन स्पर्धेत सात वर्षाच्या लहान मुलांपासून ते ७८ वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचा एकात्मता चौकात समारोप करण्यात आला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भीमोत्सव समितीचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, अमीन शेख, नीलेश वाघ, संजय कटारे, रवि गायकवाड, पी. आर. निळे, संतोष आहिरे, प्रकाश बोधक, संजय भालेराव, सतीश केदारे, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
क्रीडाशिक्षक दिवाकर दोंदे, प्रवीण व्यवहारे, सुधाकर कातकडे, सुनील नाईक, हेमंत कातकडे, हरीश चंद्रात्रे, मनोज ठोंबरे, दत्तू जाधव आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.