संमेलन आयोजकांचा भगूरला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:30+5:302021-02-05T05:39:30+5:30

यासंदर्भात भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे मागणी केली होती. मात्र संयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव ...

The organizers of the meeting protested against Bhagur | संमेलन आयोजकांचा भगूरला निषेध

संमेलन आयोजकांचा भगूरला निषेध

यासंदर्भात भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे मागणी केली होती. मात्र संयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणे टाळले असा आरोप करण्यात आला असून, यात काहीजण बुद्धिभेद करीत आहेत. वस्तुतः सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, गोविंदाग्रज, रामदासस्वामी या सर्वांचेच कार्य हे असामान्यच आहे. त्यामुळे मराठी माणूस म्हणून असा विरोध असण्याचे काही एक कारण नाही. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रत्येक ठिकाणी अन्याय केला जातो त्यांच्या नावाला विरोध केला जातो, असेही सावरकरप्रेमींचे म्हणणे आहे. यावेळी मनोज कुवर, प्रशांत लोया, मृत्युंजय कापसे, प्रमोद आंबेकर, निलेश हासे, भूपेश जोशी, श्याम देशमुख, गणेश राठोड, रामदास गाढवे, प्रवीण वाघ, सुनील जोरे, रतन वाघचौरे, शांताराम करंजकर, मधुकर कापसे, चेतन आंबेकर, रमेश नाईकवाडे, चेतन आंबेकर आदी उपस्थित होते.

(फोटो ०३ भगुर) भगूरला साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध करताना मनोज कुवर, निलेश हासे आदी.

Web Title: The organizers of the meeting protested against Bhagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.