पिंपळगाव लेपच्या विद्यार्थिनीने बनविले जैविक सॅनिटायजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 15:01 IST2020-04-23T15:01:30+5:302020-04-23T15:01:40+5:30
जळगाव नेऊर : पिंपळगाव लेप येथील पल्लवी दाभाडे या विद्यार्थिनीने जैविक सॅनिटायजर तयार करून परिसरातील शेतमजूर, ग्रामस्थांना वाटप केले आहे.

पिंपळगाव लेपच्या विद्यार्थिनीने बनविले जैविक सॅनिटायजर
जळगाव नेऊर : पिंपळगाव लेप येथील पल्लवी दाभाडे या विद्यार्थिनीने जैविक सॅनिटायजर तयार करून परिसरातील शेतमजूर, ग्रामस्थांना वाटप केले आहे.
सोशल मीडियावर शासनाच्यावतीने कोरोनापासुन सुरक्षितता म्हणून सॅनिटायजर, मास्क, हँडवॉश वापरण्याचे आवाहन केले जात आहे. पण ग्रामीण भागात सॅनिटायजरचा तुटवडा असल्याने कोपरगाव येथील महिला महाविद्यालयात एस.वाय.बी.एस्सी शिक्षण घेत असलेल्या पल्लवी दाभाडे या विद्यार्थिनीने विविध संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन घेवून कापूर, लिंबाचा पाला, तुळशीचे पाने, कोरफड, तुरटी, पाणी, खोबरेल तेल यांचे मिश्रण करून तयार करून जैविक सॅनीटायजर तयार केले. तयार झालेले सॅनिटायजर बाटली बंद करून परिसरातील शेतमजूर, ग्रामस्थांना पल्लवीने वाटप केले. या बरोबरच गरजु महिलांना धान्य वाटप करून मदतीचा हातही दिला. पल्लवीच्या या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.