सिन्नर तालुक्यात महिलांनी साकारल्या सेंद्रिय परसबागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:24+5:302021-06-26T04:11:24+5:30
नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. ...

सिन्नर तालुक्यात महिलांनी साकारल्या सेंद्रिय परसबागा
नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथे उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यात महिला समूहाच्या साहाय्याने विविध ठिकाणी सेंद्रिय पद्धतीच्या परसबागा तयार करून प्रत्येक कुटुंबाला विषमुक्त पालेभाज्या व फळभाज्या उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या परसबागांत लागवड करण्यासाठी गावरान वांगी, पालक, मेथी, भेंडी, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, कारली, घेवडा, वाल, शेपू, मिरची, आलू, कोरफड, वाल, पुदिना, फुलझाडे आदींसह विविध वाणांची लागवड करण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक म्हणून जास्तीत जास्त परसबाग तयार करण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसहायता समूहातील महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कासारवाडी येथे शिला लोहकरे यांच्या शेतजमिनीत परसबाग अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुका व्यवस्थापक नितीन कापुरे, विजय कुटे, कस्तुरा गवारे, प्रभाग समन्वयक युवराज चव्हाण, अविनाश राठोड, ज्ञानेश्वर डावरे आदींसह महिला बचतगटाच्या सदस्य उपस्थित होत्या.
-----------------------------
गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार, कुपोषण मुक्त कुटुंब यासाठी दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांंचा वापर व्हावा यासाठी परसबाग लागवड करणे आवश्यक आहे.
-नितीन कापुरे, तालुका व्यवस्थापक
फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत साकारलेली परसबाग. (२५ परसबाग)
===Photopath===
250621\25nsk_4_25062021_13.jpg
===Caption===
२५ परसबाग