Organic Horticulture Flowers by Tribal Women's Board | आदिवासी महिला मंडळाने फुलविली सेंद्रिय परसबाग

आदिवासी महिला मंडळाने फुलविली सेंद्रिय परसबाग

पिंपळगाव बसवंत  : आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतांपासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने आहेरगाव येथील आदिवासी महिलांनी परसबाग फुलविली आहे. त्यातून पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून पिके घेतली जात आहेत.
आहेरगाव येथील शेतकरी नानुबाई गवळी यांनी आपली जागा महिला मंडळाला उपलब्ध करून देत या जागेत नांगरण, माती टाकणे, संरक्षक कुंपण घालण्यासाठी निधी देखील ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिला आहे.काट्या कुट्या असलेल्या जागेची मशागत केली. त्यात माती टाकून नांगरून वाफे बनविणे त्या वाफ्यांना विटा लावणे , प्राण्यांपासून बागेचे संरक्षण होण्यासाठी सभोवती कुंपण घातले आहे. यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून दिला सुरवातीला जुन्या साड्या, गोणपाट, युरियाची पोती, बांबू अशा वस्तूंचा वापर करण्यात आला. पण ग्रामपंचायतने सहकार्य केल्याने एक गोलाकार स्ट्रक्चर तयार करण्यात आले व सुंदर अशी परस बाग तयार केली. त्या परस बागेच्या गोेलाकार रचनेमध्ये बाहेरील गोलामध्ये वांगी ,कांदे लसूण,पपई व शेवगा, मधल्या टप्प्यात वांगी, टोमॅटो,मिर्ची मध्यभागी मिरची मेथी ,कांदे ,भेंडी , डिंगऱ्या,आळु, चटकचदणी वेल, लाल बिट,गाजर,वांगी ,पुदिना, पालक, तर शेवंती ,चणीगुलाब ,मोगरा,झेंडूची फुलेआदी फुलांची देखील लागवड केली आहे. यासाठी आहेरगाव येथील ग्रामपंचायत ,पोलिस पाटील व जिजामाता ग्रामसंघ महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.
------------------------------
दर्जेदार भाजीपाला निर्मितीचा उद्देश
रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खते, शेण, राख,लसूण व कडू लिंबाच्या पानाचा रस कुटून त्यात गाईचं गोमूत्र टाकून २१ दिवस आंबवले जाते व २२ व्या दिवशी सकाळी ते औषध फवारले जातात व विना रासायनिक पिके घेतले जातात. त्यामुळे येथील जमिनीचा पोत सुधारणे, पाण्याची बचत, मातीची धूप रोखणे, जलधारणशक्ती वाढविणे असे अनेक फायदे होत असून विषमुक्त भाजीपाला निर्मिती होत असल्याची माहिती या मंडळाच्या अध्यक्ष सविता गांगुर्डे ,संगीता बागुल व विद्या देशमुख यांनी दिली.
.....................................
हा परसबागा फुलविण्यासाठी ग्रामपंचायत व जागा मालक गवळी यांनी मदत केली. शासनाने देखील मदत केली तर आहरेगावतच नाहीतर प्रत्येक गावात सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करणारे परस बाग तयार होतील. त्याचा आरोग्यासाठी देखील उपयोग होईल.
-सविता गांगुर्डे, महिला मंडळ अध्यक्ष

Web Title:  Organic Horticulture Flowers by Tribal Women's Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.