शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

अवयवदान जनजागृती : धावले हजारो नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:50 IST

शुभारंभाप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘मेट’च्या संचालक शेफाली भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून रनला सुरुवात केली.

ठळक मुद्दे८६ वर्षांचे आजोबा अन् विशेष विद्यार्थ्याने वेधले लक्षप्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

नाशिक : अवयवदान जनजागृती व नोंदणी प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी शेकडो नाशिककर आबालवृद्धांनी ‘रन फॉर आर्गन’मध्ये सहभागी होऊन तीन किलोमीटरपर्यंत धाव घेतली. दरम्यान, सहभागी काही विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.स्वराज फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.२१) सकाळी ‘रन फॉर आर्गन’ हा उपक्र म आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शुभारंभाप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘मेट’च्या संचालक शेफाली भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून रनला सुरुवात केली. तत्पूर्वी सहस्त्रनाद, महिलांचे ढोल पथक, विविध संस्थांचे बँड पथक, लेजीम पथक यांनी प्रात्यक्षिके करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच सुषमा दुग्गड यांचे हास्यक्लब व सई संघवी यांचे झुम्बा प्रात्यक्षिक आकर्षण ठरले.‘रन फॉर आॅर्गन’मध्ये शेकडो तरुण, तरुणींसह वृद्धांनीही नोंदणी करत सहभाग घेतला. दरम्यान, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सौंदर्यवती नमिता कोहोक, नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा,  धावपटू मोनिका आथरे, बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल, मोतीवाला कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर स्वानंद शुक्ला, नगरसेवक समिना मेमन, डॉ. विक्रांत जाधव, अ‍ॅड. आकाश छाजेड आदी मान्यवरांनी सहभाग घेत सहभागी नाशिककरांचा उत्साह वाढविला. प्रारंभी संयोजक योगीता खांडेकर यांनी उपस्थिताना रनची संकल्पना समजावून सांगितली. सहभागी नागरिकांना फाउंडेशनकडून पदक प्रदान करण्यात आले.८६ वर्षांचे आजोबा अन् विशेष विद्यार्थ्याने वेधले लक्षरन फॉर आर्गन या उपक्रमात एक ८६ वर्षीय डॉ. सुब्रमण्यम व स्वयम पाटील या विशेष विद्यार्थ्याने सहभागी होऊन ऊर्जा वाढविली. नियतीने जरी व्यंग दिले असले तरी त्यावर जिद्दीने मात करता येते, हे स्वयमने दाखवून देत अवयवदान जनजागृतीसाठी आपला सहभाग नोंदविला. नाशिक केंब्रिज हायस्कूल, मोतीवाला मेडिकल कॉलेज, ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वाद्य वाजवून व लेजीमचे प्रात्यक्षिक सादर केले.---

 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यOrgan donationअवयव दान