Organ donation registration from 44 donors | ४४ दात्यांकडून अवयवदान नोंदणी

अवयवदान दिनानिमित्त इंदिरानगर परिसरात राबविण्यात आलेली जनजागृती मोहीम.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : परिसरात जनजागृती अभियान

इंदिरानगर : जागतिक अवयवदान दिनानिमित्त मानवता हेल्प फाउण्डेशन, सायकलिस्ट फाउण्डेशन व लायन्स क्लब आयोजित उपक्रमात ४४ दात्यांनी अवयवदानासाठी नावनोंदणी केली.
‘अवयवदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ या अभियानांतर्गत सिटी गार्डन, जॉगिंग ट्रॅक येथे फिजिकल डिस्टन्सचे पालन करत अवयवदाता नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व व समाजात भासणारी अवयवदानाची गरज व त्याची पद्धत याबाबत प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी मानवता हेल्प फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र्र दुसाने, नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे व लायन्स क्लब आॅफ नाशिक कापोर्रेटचे अध्यक्ष लायन रमेश पवार, साधना दुसाने, डॉ. मनीषा रौंदळ, वासंती वनारा,चंद्रकांत नाईक, शेखर सोनवणे, अशोक वनारा, राजू व्यास, उत्तम पवार, मोहन रानडे, अनिल वराडे, डॉ. नितीन रौंदळ, दीपक मोरे, नाना आठवले, नाना गायकवाड, योगेश शिंदे, गणेश कळमकर, यशवंत मुधोळकर, श्रीराम पवार आदी उपस्थित होते.
अभियानात ४४ अवयवदात्यांनी अवयवदानासाठी नावनोंदणी केली. सर्व अवयवदात्यांना मानवता हेल्प फाउण्डेशनतर्फे नोंदणी प्रमाणपत्र व अवयवदानपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Organ donation registration from 44 donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.