महाविद्यालयांना योग दिन साजरा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST2021-06-18T04:11:05+5:302021-06-18T04:11:05+5:30

राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय व राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय ...

Orders for colleges to celebrate Yoga Day | महाविद्यालयांना योग दिन साजरा करण्याचे आदेश

महाविद्यालयांना योग दिन साजरा करण्याचे आदेश

राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय व राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. त्यानुसार २१ जूनला योग दिनाच्या निमित्ताने योगनासनांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सूचना करून तसेच विद्यार्थ्यांचे ई-मेल, फेसबुक,व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून योगासनांविषयी व्याख्याने आयोजित करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम व सूचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासन तसेच स्थानिक प्रशासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यांचे पालन करून महाविद्यालय व परिसंस्थांच्या पातळीवर उपक्रम राबवून त्याचा छायाचित्रासह अहवाल विद्यापीठाला सादर करण्याच्या सूचनाही प्राचार्यांना या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.

Web Title: Orders for colleges to celebrate Yoga Day