महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरवस्थेचे दर्शन व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:40 IST2018-01-05T00:39:52+5:302018-01-05T00:40:57+5:30
नाशिक : महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाला महापौर रंजना भानसी आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी अचानक भेट दिली.

महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरवस्थेचे दर्शन व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश
नाशिक : महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाला महापौर रंजना भानसी आणि सभागृहनेता दिनकर पाटील यांनी अचानक भेट दिली असता त्यांना तलावाच्या दुरवस्थेचे दर्शन घडले. यावेळी संतप्त झालेल्या महापौरांनी अधिकाºयांना धारेवर धरत व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश दिले.
महापौर रंजना भानसी यांच्यासह सभागृहनेता पाटील, विधी समितीच्या सभापती शीतल माळोदे यांनी त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावाची अचानक पाहणी केली. यावेळी, महापौरांना प्रवेशद्वारावरच कचºयाचे दर्शन घडले. तसेच जलतरण तलावातील डायव्ंिहग प्लॅटफार्म नादुरुस्त आढळून आला. तलावातील पाणी बदलले जात नसल्याने शेवाळ साचल्याचे दिसून आले. याशिवाय, तलावातील पाण्याची गळती सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी तलावात दुरुस्तीची कामे सहा महिन्यांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले तरी त्याचा कुठेही मागमूस दिसून न आल्याने महापौर संतप्त झाल्या. यावेळी त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाºयांना पाचारण करत त्यांची झाडाझडती घेतली. तलावाचे व्यवस्थापकास निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी काढले.