देवळालीतील सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 18:07 IST2020-08-20T18:06:32+5:302020-08-20T18:07:00+5:30

देवळाली कॅम्प : पावसाळा सुरू झाल्यापासून देवळाली परिसरातील सार्वजनिक मुताऱ्या व सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याच्या वाढत्या तक्रारिंची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी तातडीने या सर्व ठिकाणी उपायोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागासह बांधकाम विभागाला दिले आहे.

Order to clean public toilets in the temple | देवळालीतील सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ करण्याचे आदेश

देवळालीतील सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ करण्याचे आदेश

देवळाली कॅम्प : पावसाळा सुरू झाल्यापासून देवळाली परिसरातील सार्वजनिक मुताऱ्या व सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याच्या वाढत्या तक्रारिंची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी तातडीने या सर्व ठिकाणी उपायोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागासह बांधकाम विभागाला दिले आहे.बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार सहाय्यक अभियंता विलास पाटील आरोग्य अधीक्षक रजिंदरसिंह ठाकुर यांनी मेन स्ट्रीट येथील मुल्ला कॉम्प्लेक्स परिसरात सार्वजनिक मुतारी स्वच्छता तर वार्ड क्रमांक १ मधील मिठाई स्ट्रीटवर असलेल्या सार्वजनिक शौचालयाच््यया दुरावस्थेची पाहणी केली. येथील आरोग्य विभागाकडून सार्वजनिक शौचालय यांसह सार्वजनिक मुताºया यांच्या स्वच्छता व देखभाल करणेकामी दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सदर बाजार भागासह आनंद रोड,संसरी लेन, लाम रोड वर असर्णा­या कचरा, सार्वजनिक शौचालय व मुताऱ्यांची पहाणी केली. यावेळी येथील रिपाइंचे पदाधिकारी गिरीश मोरे यांनी वार्ड क्रमांक १ मधील सार्वजनिक शौचालय बाबत निर्माण झालेल्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर तातडीने या सर्व समस्या मार्गी लावण्याकामी आरोग्य विभागासह बांधकाम विभागातील अभियंता व अधिकारी तसेच कर्मचारी यांना येथील उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहे. तातडीने त्या मार्गी लावण्यात येतील याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यााात आले आहे. या संदर्भात उपाध्यक्ष भगवान कटारिया यांच्याकडे काही दिवसांपूर्वी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. फोटो ल्ल२‘ वर

 

Web Title: Order to clean public toilets in the temple