शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

नाशिक शहरातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 18:19 IST

महापालिका स्थायी समितीची बैठक : अग्निशमनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ठळक मुद्देधार्मिक स्थळ हटविण्यात आले; परंतु रस्त्यांत ठाण मांडून बसलेल्या झोपड्या हटविण्यात येत नसल्याबद्दल आश्चर्यबिटको रुग्णालयात आग प्रतिबंधक व आगशोधक यंत्रणा बसविण्याच्या प्रस्तावाला हरकत

नाशिक : रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेशित करत रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या.महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी वडाळागाव येथे रस्त्यात असलेले धार्मिक स्थळ हटविण्यात आले; परंतु रस्त्यांत ठाण मांडून बसलेल्या झोपड्या हटविण्यात येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सूर्यकांत लवटे यांनीही नाशिकरोड परिसरात झालेल्या अतिक्रमणांबद्दल प्रश्न उपस्थित करत सदर अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त का मिळत नाही, असा सवाल केला. यावेळी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे प्राधान्यक्रमाने काढून घेण्याचे आदेशित केले. दरम्यान, मुकेश शहाणे यांनी ठरावीक प्रभागांनाच क्रीडा निधीतून व्यायामशाळांचे साहित्य वाटप होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि वजा तरतूद असतानाही निधी वाटपाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बिटको रुग्णालयात आग प्रतिबंधक व आगशोधक यंत्रणा बसविण्याच्या प्रस्तावाला सदस्यांनी हरकत घेतली. अग्निशमन दलाचे प्रमुख हे गैरहजर असल्याने आणि त्यांच्या कारभाराविरुद्ध प्रचंड तक्रारी असल्याने सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. मुशीर सय्यद यांनी अशोका मार्गावर दुभाजक व पथदीप नसल्याची तक्रार केली. यावेळी शहर अभियंता उत्तम पवार यांनी त्याबाबत तरतूद करण्याची ग्वाही दिली. भागवत आरोटे यांनी भंगार बाजार हटविल्यानंतर नियुक्त केलेल्या पथकांकडून होणाºया कार्यवाहीबद्दल शंका उपस्थित केली. सुनीता पिंगळे यांनी पंचवटी प्रभागात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन होऊनही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी काही शेतकऱ्याचा विरोध असल्याचे सांगितल्यावर सभापतींनी महापालिकेची जागा असताना तत्काळ काम सुरू करण्याचे आदेशित केले. अलका अहिरे यांनी डेंग्यूच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुशीर सय्यद यांनी पेस्टकंट्रोलच्या ठेक्याबाबत कार्यवाहीचा तपशील मागितला असता सभापतींनी वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सदर ठेका रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशित केले. मुकेश शहाणे यांनी खासगी मोबाइल कंपन्यांच्या लागणाऱ्या  फलकांकडून महापालिकेने करवसुली करावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका