करवाढीच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:49 IST2018-07-14T00:48:42+5:302018-07-14T00:49:54+5:30

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकारात लागू केलेले वार्षिक भाडेमूल्य आणि खुल्या भूखंडावरील कर आकारणीच्या विरोधात सत्तारूढ भाजपाला महासभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असून, सोमवारी (दि. १६) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. त्यात करवाढ रोखण्यासाठी एकत्रित लढा देण्यात येणार आहेत. भाजपातील ज्या नगरसेवकांना करवाढ नको आहे, अशांनादेखील या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केले आहे.

Opposition's Opinion Against Taxation | करवाढीच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ

करवाढीच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ

ठळक मुद्देरणनीतीसाठी बैठक भाजपाला आवाहन

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकारात लागू केलेले वार्षिक भाडेमूल्य आणि खुल्या भूखंडावरील कर आकारणीच्या विरोधात सत्तारूढ भाजपाला महासभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असून, सोमवारी (दि. १६) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. त्यात करवाढ रोखण्यासाठी एकत्रित लढा देण्यात येणार आहेत. भाजपातील ज्या नगरसेवकांना करवाढ नको आहे, अशांनादेखील या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केले आहे.
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यात करवाढ केल्यानंतर त्याच्या विरोधात बैठका, मेळावे सुरू झाले होते.
 हा विरोध शमविण्यासाठी भाजपाने तातडीने महासभा घेतली असली तरी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने त्यावर निर्णय घेता आला नव्हता. उलट आयुक्तांनी करवाढ घोषित करताना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्याचा ठराव केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापौरांना दरडाविल्याने तसे धाडसही महापालिकेने केले नव्हते. दरम्यान, आता आचारसंहिता संपल्यानंतर तहकूब महासभा येत्या १९ जुलैस होणार असून, त्यात आधी करवाढीवर निर्णय द्या, असा आग्रह धरत कामकाज रोखण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. यासंदर्भात विरोधी गटांची बैठक सोमवारी (दि. १६) होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. या बैठकीत महासभेची रणनीती ठरणार आहे.
सभा गुंडाळली तर....
१९ जुलै रोजी प्रथम स्थगित महासभाच होणार असून, जोपर्यंत त्यात करवाढ रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत सभा चालली तरी ती चालविण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. गोंधळाचे निमित्त करून महापौरांनी सभा गुंडाळलीच तर यापुढे सभाच होऊ दिली जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Opposition's Opinion Against Taxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.