शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नदी-खोऱ्यातील पाणी मराठवाड्यास देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:39 IST

वैतरणा- गारगाई-कडवा-गोदावरी तसेच दमणगंगा-एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे हक्काचे प्रकल्प आहेत. या दोन प्रकल्पातून बारा टीमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सिन्नर तालुक्याचा

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आक्रमक : जलसंपदामंत्र्यांना साकडे प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ४१ कोटी रुपये शासनाकडून मंजूरही झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील वैतरणा, गारगाई, कडवा, दमणगंगा या जिल्ह्यातील नदी, खोऱ्यांचे पाणी मराठवाड्यास नेण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला असून, सदरचे पाणी मराठवाड्यास देण्याऐवजी नदीजोड प्रकल्पाद्वारे वळविल्यास सुमारे बारा टीएमसी अधिकचे पाणी जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा संपुष्टात येणार असल्याने हे दोन्ही प्रकल्प वगळण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैतरणा- गारगाई-कडवा-गोदावरी तसेच दमणगंगा-एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे हक्काचे प्रकल्प आहेत. या दोन प्रकल्पातून बारा टीमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सिन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचाच पुसला जाणार आहे त्याचबरोबर नाशिक शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने जिल्ह्यातील नदीखोºयांमध्ये जमा होणारे पाणी मराठवाड्यात नेण्याचा निर्णय घेतला. मुळात नाशिक शहरासह सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघावा यासाठी खासदार हेमंत गोडसे, जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांची शासनाकडून वैतरणा-गारगाई कडवा तसेच दमणगंगा- एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतले, तसेच नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ४१ कोटी रुपये शासनाकडून मंजूरही झाले आहेत. यापैकी दमणगंगा-एकदरे या प्रकल्पातून नाशिक शहरासाठी पाच टीएमसी पाणी, तर गारगाई-वैतरणा- कडवा-देव या लिंक प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी सात टीएमसी पाणी अधिकचे उपलब्ध होणार आहे. या सात टीएमसी पाण्यातून सिंचन, औद्योगिक वापराच्या पाण्यासह दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरचा पाणीप्रश्न सुटणार आहे. या दोन्हीही प्रकल्पांचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून, अशातच मागील सरकारने नदीखोºयात जमा होणारे सर्वच पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हावासीयांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प नदीजोड प्रकल्पातून वगळावेत, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, राजेंद्र जाधव, रंजन ठाकरे आदींनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक