शाळेच्या जागेत जलतरण तलावाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:45+5:302021-02-05T05:40:45+5:30

सिडको प्रभाग समितीची सभा सभापती चंद्रकांत खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत सुरुवातीला विषयपत्रिकेवरील सर्व विकासकामांना विनाचर्चा ...

Opposing the swimming pool in the school space | शाळेच्या जागेत जलतरण तलावाला विरोध

शाळेच्या जागेत जलतरण तलावाला विरोध

सिडको प्रभाग समितीची सभा सभापती चंद्रकांत खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत सुरुवातीला विषयपत्रिकेवरील सर्व विकासकामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. त्यानंतर नगरसेवकांनी मुख्य रस्त्यांवरील किंवा नगरसेवकांच्या घर आणि कार्यालयासमोरच केवळ साफसफाई केली जाते. प्रभागातील मुख्य रस्ते वगळता गल्लीबोळातील साफसफाई होत नसल्याची तक्रार केली. त्याचप्रमाणे पवननगर भागासह मुख्य चौकांमध्ये अतिक्रमण वाढत असून अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. उद्यान विभागाचा कारभार व्यवस्थितपणे चालत नसून उद्यानांची देखभाल होत नसल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. उमा पार्कसह परिसरातील कामटवाडे, अंबड भागातील नाल्यांमुळे दुर्गंधी वाढत असल्याचा आरोप करण्यात आला असून, नाल्यांच्या दुर्गंधीचा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. या बैठकीसाठी नगरसेवक ङि जी सूर्यवंशी ,शाम साबळे, निलेश ठाकरे, भगवान दोंदे, दीपक दातीर, राकेश दोंदे, धनाजी लगड, साहेबराव निकम, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, प्रतिभा पवार, छाया देवांग, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, सुवर्णा मटाले, कावेरी घुगे यांचेसह विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटीलांसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चौकट===

सभापतींच्या पत्राचा परस्पर वापर

प्रभाग क्रमांक २८ मध्ये जलतरण तलाव उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सेना नगरसेवक दीपक दातीर यांनी स्वतःचे लेटरहेड न वापरता सभापती चंद्रकांत खाडे यांच्या लेटरहेडवर प्रस्ताव तयार केला. सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रभाग सभेत असलेल्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेत असताना सदरचा प्रस्ताव सेनेचे नगरसेवक सुवर्णा मटाले व डि जी सूर्यवंशी यांच्याकडे जाताच त्यांनी यास आक्षेप घेत सभापती खाडे यांना तुमच्या लेटरवर हा प्रस्ताव कसा असा प्रश्न उपस्थित केला. आमच्या प्रभागातील प्रश्न असल्याने आम्हाला विश्वासात का घेतले नाही. अशी विचारणा केली. दरम्यान सभापती खाडे यांच्या लेटरहेडचा नगरसेवक दातीर यांनी परस्पर वापर केल्याने त्यास आक्षेप घेत, सदरचा प्रस्ताव खाडे यांनी रद्द केला.

Web Title: Opposing the swimming pool in the school space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.