कार्ष्णी शिबिरात ज्ञानयज्ञाची संधी
By Admin | Updated: September 1, 2015 23:26 IST2015-09-01T23:26:06+5:302015-09-01T23:26:35+5:30
कार्ष्णी शिबिरात ज्ञानयज्ञाची संधी

कार्ष्णी शिबिरात ज्ञानयज्ञाची संधी
त्र्यंबकेश्वर : जव्हार फाटा येथे भव्य मंडपात आयोजित श्री गुरू कार्ष्णी कुंभमेळा शिबिरात शिवचरित्र कथा, योगशिबिर, गीता प्रवचन, भागवत कथा, महाभारत कथा आदि विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार असून त्र्यंबकवासीयांसह देशभरातून आलेल्या भाविकांना ज्ञानयज्ञाची संधी मिळणार आहे. ३० आॅगस्टपासून सुरू झालेल्या या शिबिरात दररोज ५१०० मोदकांचे गणपतीला अर्चन, रूद्राभिषेक, ललितार्चन, विष्णूआर्चन, आदित्यार्चन, हवन आदि कार्यक्रम होत आहेत. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आचार्य रमेशभाई ओझा यांचे शिवचरित्र कथा, ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत स्वामी गोविंददेवगिरी यांचे महाभारत कथा, १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वैष्णव कुल द्वाराचार्य राजेंद्रदास महाराज यांचे श्रीमद्भागवत गीता, १८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत योगशिबिर, २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत महामंडलेश्वर स्वामी नानानंद महाराज यांच्या उपस्थितीत संत संमेलन होणार आहे.
याशिवाय महामंडलेश्वर जुनापिठाधिश्वर अवघेशानंदगिरी महाराज यांचे प्रवचन, कार्ष्णी स्वामी स्वरूपानंद, स्वामी श्यामसुंदरदास, महंत परमानंद महाराज, भागवतालंकार कार्ष्णी स्वामी अद्वैतानंद महाराज, कार्ष्णी स्वामी विश्वचैतन्य महाराज, कार्ष्णी स्वामी सुमेधानंद महाराज, भागवत तत्त्वज्ञ चेतनशास्त्री महाराज, डॉ. बृजचैतन्य महाराज, डॉ. दिव्यानंद महाराज, कार्ष्णी स्वामी गोविंदानंद महाराज यांचीही विविध विषयांवर प्रवचने होणार आहेत. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
(वार्ताहर)