इंजिनिअरिंग, फार्मसी सीईटीसाठी २३ मार्चपर्यत अर्ज करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:06 IST2019-03-19T22:46:53+5:302019-03-20T01:06:09+5:30
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी आहे.

इंजिनिअरिंग, फार्मसी सीईटीसाठी २३ मार्चपर्यत अर्ज करण्याची संधी
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण-शास्त्र या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २ ते १३ मे या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ मार्चपर्यंत आहे. विलंब शुल्कासह ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येतील. ही परीक्षा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने होत आहे. इतर अभ्यासक्रमांसाठीही येत्या मार्च, एप्रिल व मे २०१९ मध्ये या सर्व प्रवेशपरीक्षा होणार असून, या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमएचटी-सीईटीची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असेल, अर्ज कसे भरावे, गुणांचा तपशील, सीईटीसाठी कोण पात्र असतील, परीक्षेची वेळ याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील संपूर्ण सूचना व माहिती वाचून समजून घ्यावी. त्यानंतर अर्ज भरावेत, असेही राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. एमएचटी सीईटीनंतर प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे वेगवेगळ्या १६ अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात एलएलबी, आर्किटेक्चर सीईटी, एचएमसीटी, बी.पीएड, बी.एड व एम.एड यांसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार आहे.
या सर्व परीक्षांतून केवळ एमएएच बी.पीएड फिल्ड टेस्ट व एमएएच एमपीएड फिल्ड टेस्ट या दोन सीईटी परीक्षा आॅफलाइन होणार असून, हे अपवाद वगळता सर्व परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. वेळापत्रकात काही बदल झाल्यास ते कळविले जाणार असून, विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशी होईल एमएचटी सीईटी परीक्षा
अर्ज करण्याची मुदत-१ जानेवारी ते २३ मार्च
४विलंब शुल्कासह अर्ज मुदत-२४ मार्च ते ३१ मार्च
४शुल्क भरण्याची मुदत-३ एप्रिल
४हॉल तिकीट उपलब्ध-२५ एप्रिल ते २ मे
४एमएचटी-सीईटी परीक्षा-२ मे १३ मे