शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:35 IST

Maharashtra Assembly Election 2019इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळविणाºया हिरामण खोसकर यांनी पराभव केला आहे.

नाशिक : इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टवादीतून कॉँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळविणाºया हिरामण खोसकर यांनी पराभव केला आहे. मतदारसंघात दोन टर्म कॉँग्रेसकडून प्रतिनिधित्व करणाºया निर्मला गावित यांना सुरुवातीपासूनच असलेला विरोध नंतर पक्षांतरामुळे आणखीणच तीव्र झाला आणि शिवसेना-भाजपमधील इच्छुकांसह विरोधकांनी खेळी करत त्यांच्याच भाषेत बाहेरचे पार्सल परत पाठविले गेले.निर्मला गावित यांनी राज्यातील बदलत्या राजकारणाची हवा लक्षात घेत कॉँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत हाती शिवबंधन बांधले आणि तेथूनच गावित यांच्याबद्दल विरोधाची धार अधिक तीव्र बनत गेली. शिवसेनेत गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी करत असलेले माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, भाजपकडून माजी आमदार शिवराम झोले या इच्छुकांची गावितांनी कोंडी केली आणि युतीतील इच्छुकांसह कार्यकर्त्यांमधील असंतोष उफाळून आला. त्यातूनच मेंगाळ, झोले यांच्यासह सेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आजी-माजी पदाधिकारी गावित विरोधात एकवटले. गावित यांना सेनेने उमेदवारी देऊ नये यासाठी मातोश्रीवरही पायधूळ झाडली गेली परंतु, मातोश्रीने दाद दिली नाही. त्यामुळे असंतोषात भर पडली. तरीही दोन्ही माजी आमदारांनी गावितांच्या व्यासपीठावर एकत्र येत आपण सोबत असल्याचे जाहीरपणे दर्शविले. मात्र, अंतर्गत सुप्त विरोधाचा फॅक्टर प्रभावशाली ठरला आणि गावित यांना तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्यापासून रोेखण्यात विरोधकांची खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.विजयाचा मार्ग सुकरविरोधकांमध्ये राष्टÑवादीचे हिरामण खोसकरही होते. इगतपुरीची जागा ही कॉँग्रेसकडे असल्याने खोसकर यांनी राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवत विजयाचाही मार्ग सुकर केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019igatpuri-acइगतपुरीNirmala Gavitनिर्मला गावितcongressकाँग्रेस