मुक्त विद्यापीठात लसीकरण मोहीम; ६०० जणांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:46+5:302021-05-05T04:24:46+5:30

माध्यमातून एका खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण सुरू करण्यात आले असून विद्यापीठाशी संबंधित एकूण ६०० लाभार्थ्यांना या लसीकरणाचा फायदा होणार ...

Open university vaccination campaign; 600 people will benefit | मुक्त विद्यापीठात लसीकरण मोहीम; ६०० जणांना होणार लाभ

मुक्त विद्यापीठात लसीकरण मोहीम; ६०० जणांना होणार लाभ

माध्यमातून एका खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण सुरू करण्यात आले असून विद्यापीठाशी संबंधित एकूण ६०० लाभार्थ्यांना या लसीकरणाचा फायदा होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई वायूनंदन यांनी दिली.

मुुक्त विद्यापीठात लसीकरण मोहिमेचा शुभारंभप्रसंगी कुलगुरू प्रा. ई वायूनंदन, तसेच कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, सीएनएस रुग्णालयाचे लसीकरण कक्ष अधिकारी सचिन सूर्यवंशी, विद्यापीठाचे लसीकरण मोहिमेचे कक्ष अधिकारी कैलास मोरे व नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. माया काळे उपस्थित होते. लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४८ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लाभ घेतला असून प्रथम टप्प्यात ४५ वर्ष वयाच्या वरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठात व्यापक लसीकरण मोहीम राबविली जात असून यात महाराष्ट्र शासनाचा आदेशानंतर लसींच्या उपलब्धतेनुसार १८ ते ४५ या वयोगटांसाठीही विद्यापीठात लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याचे डॉ. दिनेश भोंडे यांनी सांगितले.

Web Title: Open university vaccination campaign; 600 people will benefit