शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दुचाकींचेच टोइंग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:21 IST

शहर वाहतूक शाखेने नाशिकरोड परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून ‘फक्त दुचाकी’ टोइंग कारवाई करत असून, त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर टोइंगची कारवाई केली जात नाही.

नाशिकरोड : शहर वाहतूक शाखेने नाशिकरोड परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून ‘फक्त दुचाकी’ टोइंग कारवाई करत असून, त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर टोइंगची कारवाई केली जात नाही. वाहतूक नियमांचे वाहनधारकांमध्ये प्रबोधन व्हावे याकरिता शहर वाहतूक शाखा टोइंग कारवाई करत आहे की ठेकेदाराच्या भल्यासाठी वाहतूक शाखा कार्यरत आहे? असा प्रश्न दुचाकीचालकांकडून विचारण्यात येत आहे़नाशिकरोड परिसरातील मुख्य रस्त्यावरील निवासी व कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये मनपामुळे त्या इमारतीत पार्किंगचा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे. वाढते शहरीकरण, वाहनांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या याचा मनपाने विचार न केल्याने पार्किंगची जागा उपलब्ध नाही. पार्किंगची जागा आहे तेथे अतिक्रमणाने विळखा आहे.शहर वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांपूर्वी नाशिकरोड परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या दुचाकी-चारचाकीवाहनांवर टोइंग कारवाई करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, कोंडी होते, वाहतूक नियम पाळणे, शिस्त लागावी म्हणून शहर वाहतूक शाखेने टोइंग कारवाईस प्रारंभ केला. वास्तविक खरोखरच वाहनचालकांना शिस्त लागावी, वाहतुकीचे नियम पाळावे असे शहर वाहतूक शाखेला वाटत असेल तर पहिल्यांदा गाडी टोइंग करून आणून दिल्यानंतर संबंधित चालकाचे प्रबोधन करून समज देणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदारांचे कर्मचारी मनमानी पद्धतीने नो पार्किंगमधील दुचाकी उचलून टोर्इंग कारवाई करत असल्याने सर्वसामान्य दुचाकीचालकांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. ज्या नो पार्किंगमधून दुचाकीवर टोइंगची कारवाई केली जाते त्याच्या बाजूलाच असलेल्या चारचाकी गाडीवर मात्र टोर्इंगची कारवाई केली जात नाही. दुचाकी पेक्षा चारचाकीमुळे वास्तविक जास्त वाहतुकीची कोंडी होते. मात्र ठेकेदारांकडे चारचाकी गाडी उचलण्यासाठी स्वतंत्र वाहन नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून फक्त दुचाकीवरच टोइंग कारवाई केली जात आहे. चारचाकी गाडी टोइंग करण्यासाठी स्वतंत्र वाहन नाही हा ठेकेदारांचा प्रश्न आहे. ठेका घेतल्यानंतर चारचाकीच्या टोइंगसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध केले नाही म्हणून वाहतूक शाखेने वास्तविक ठेकेदारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.दुर्गादेवी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आलेले भाविक, महिला यांच्या दुचाकी टोइंग करून कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त मंदिराशेजारील नाशिकरोड न्यायालयाला सुट्टी असल्याने जास्त गर्दी नसताना फक्त वसुलीसाठी कारवाई करण्यात आल्याची संतप्त भावना भाविक व्यक्त करत होते.रेल्वेपार्किंग चालकांकडून वसुलीनाशिकरोड रेल्वेस्थानकांत प्रवेश करणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला(करवा भवन) नो पार्किंग आहे. मात्र त्या ठिकाणी उभ्या राहणाºया दुचाकीचालकांकडून रेल्वेस्थानकात वाहन तळांचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाºयाने पार्किंगचे पैसे घेतले. काही वेळाने टोर्इंग कारवाई करणाºया ट्रकमधून करवा भवन भिंतीलगतच्या ११ दुचाकी नो पार्किंगमधून उचलून आणल्या. त्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ११ दुचाकी टोइंग कारवाईचा दंड रेल्वेस्थानक पार्किंग ठेकेदारांकडून वसूल केला.४वाहतुकीचे नियम व शिस्त पाळावी याकरिता साधी चूक केलेल्या वाहनधारकांचे प्रबोधन, मार्गदर्शन करून समज देणे गरजेचे आहे. परंतु फक्त दंड आकारून वाहन चालक नियम व शिस्त पाळणार असेल, असा केलेला समज चुकीचा ठरत आहे. अनेक अपघातामुळे जेलरोडवरून सकाळपासून रात्रीपर्यंत अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र खुलेआम बिटको चौकातून जेलरोडमार्गे अवजड वाहतूक सुरू असते.वादविवादामुळे पोलीस वैतागलेभाजीपाला, औषध इतर वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा बॅँकेत अथवा इतरत्र दोन मिनिटांकरिता आलेल्या चालकांची दुचाकी टोइंग केल्यानंतर संबंधित चालक दंड पावती फाडणाºया कर्मचाºयांशी वाद घालतात. शासकीय, पोलीस आदी खात्याचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी यांच्या नातेवाईक, मित्राची गाडी टोर्इंग करून आणल्यानंतर संबंधित स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी फोन करतो तेव्हा त्या कर्मचाºयाला स्वत: आर्थिक पदरमोड करत संबंधित साहेबांच्या नातेवाईक, मित्राची गाडी सोडावी लागते. टोइंग कारवाईमुळे महिला दुचाकी चालक अक्षरश: रडतात पण दंडाची पावती फाडल्याशिवाय सोडत नाही. दंडाची पावती फाडताना चालकांशी होणारे वादविवाद, त्रस्त वाहनचालक यामुळे त्या ठिकाणी काम करणारे वाहतूक पोलीस वैतागले आहेत़

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा