पंचवटीत एकच अर्ज दाखल

By Admin | Updated: January 28, 2017 23:24 IST2017-01-28T23:24:15+5:302017-01-28T23:24:32+5:30

प्रभाग २ मध्ये अर्ज : दुसऱ्या दिवशीही उमेदवारांची पाठ

Only one application filed in Panchvati | पंचवटीत एकच अर्ज दाखल

पंचवटीत एकच अर्ज दाखल

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या  प्रक्रि येस शुक्र वारी (दि. २७) पासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस असला तरी इच्छुकांनी अमावास्या असल्याने हा दिवस टाळला होता. मात्र शनिवारी दुसऱ्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.  महापालिका निवडणुकीसाठी पंचवटी विभागीय कार्यालयात निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली असून, यंत्रणा सज्ज झाले आहेत. पंचवटी विभागातील ६ प्रभागांसाठी २ निवडणूक निर्णय अधिकारी व ६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक २ (क) मधून मनसेचे माजी नगरसेवक अनंत देवराम सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अन्य प्रभागांसाठी मात्र उमेदवारांनी आजही पाठ फिरविली.  इच्छुक उमेदवारांनी कार्यालयातील निवडणूक कक्षात धाव घेऊन निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ना हरकत दाखले कोठे मिळतात याची चौकशी करण्याचे काम केले.



 

Web Title: Only one application filed in Panchvati