नाशिक जिल्ह्यात अवघे आठ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 01:09 IST2022-03-21T01:08:06+5:302022-03-21T01:09:07+5:30
जिल्ह्यात रविवारी (दि. २०) ७ रुग्ण आढळले असून त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या एकने अधिक आहे. म्हणजेच दिवसभरात आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात अवघे आठ रुग्ण
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. २०) ७ रुग्ण आढळले असून त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या एकने अधिक आहे. म्हणजेच दिवसभरात आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी आढळलेल्या सात रुग्णांपैकी पाच ग्रामीण भागातील तर दोन रुग्ण नाशिक शहरातील आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. मात्र, केवळ नाशिक शहरात लसीकरणाचे प्रमाण अधिक असल्याने शहरी भागातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.