शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बिघडलेल्या आरोग्याची जबाबदारी आयुक्तांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:29 IST

शहरात गेल्या ७२ तासांत स्वाइन फ्लूने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, वेगवेगळ्या साथरोगांनी आतापर्यंत ७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला आयुक्तांनाच जबाबदार धरीत नगरसेवकांनी आयुक्त मुंढे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नाशिक : शहरात गेल्या ७२ तासांत स्वाइन फ्लूने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, वेगवेगळ्या साथरोगांनी आतापर्यंत ७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला आयुक्तांनाच जबाबदार धरीत नगरसेवकांनी आयुक्त मुंढे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  महासभेत शुक्रवारी (दि.१९) विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आरोग्यच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडताना शहरातील आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनपाच्या रुग्णालयांमध्ये अस्वच्छता असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर लक्ष वेधले. घंटागाडीच्या ठेकेदारांना मनपाने पाच कोटी रुपयांचा दंड केला असून, त्यातून घंटागाडीचे काम सुरळीत सुरू नसल्याचे प्रशासन जाहीरपणे मान्य करीत असल्याचे गुरुमित बग्गा म्हणाले, तर भाजपाच्या नगरसेवक अलका अहिरे यांनी सभागृहात दूषित पाण्याची बाटली दाखवून सत्ताधारी भाजपाला घरचा अहेर दिला. तर घंटागाड्यांचे ठेकेदार नियमित काम करीत नाहीत, असा आरोप करीत अस्वच्छतेकडे लक्ष वेधले.महाआंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाविरोधात लढा...शहरातील बिटको, जाकीर हुसेन रुग्णालय, स्वामी समर्थ रुग्णालय, सातपूर, मायको रुग्णालयात रुग्णसेवेत अतिशय निष्काळजीपणा होत असून, निवासी वैद्यकीय अधिकाºयांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतानाच आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाने सतर्क भूमिका घेतली नाही, तर महाआंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे सभागृहात देण्यात आला.प्रियंका माने यांचा सभात्यागभाजपाच्या नगरसेवक प्रियंका माने यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाच साथ आजाराने मृत्यू झाला, त्यांच्यावर उपचार करण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉ. जयराम कोठारी व डॉ. इंदुलकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर सभागृहाने सुचविलेली कारवाई प्रशासनाने केलेली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर आयुक्तांनी या प्रकरणात डॉ. इंदूलकरांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली असून, डॉ. कोठारी यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले. परंतु माने यांचे त्यावरही समाधान न झाल्याने त्यांनी अखेर सभात्याग केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेHealthआरोग्य