शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांचे वाटप निकालानंतरच

By admin | Updated: October 18, 2014 00:18 IST

जिल्हा परिषद : खातेवाटपाबाबत रहस्य कायम

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीसह महत्त्वाच्या असलेल्या शिक्षण व आरोग्य आणि पशुसंवर्धन व कृषी समिती यांचे वाटप हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होण्याची दाट शक्यता असून, या खातेवाटपात राष्ट्रवादीतच चुरस वाढल्याचे चित्र आहे.महिला व बालकल्याण समिती सभापतिपद हे शिवसेनेच्या शोभा सुरेश डोखळे यांना मिळाले असून, समाजकल्याण समिती सभापतिपद हे अपेक्षेनुसार राष्ट्रवादीच्या उषा बच्छाव यांना मिळाले आहे. आता उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्यासह विषय समिती सभापती केदा अहेर व किरण थोरे यांना नेमके कोणते खाते मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातील चर्चेनुसार बांधकाम व अर्थ समिती ही अपक्ष किरण पंढरीनाथ थोरे यांना, तर शिक्षण व आरोग्य समिती भाजपाचे केदा अहेर यांना, तसेच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना मागील उपाध्यक्षांप्रमाणेच कृषी व पशुसंवर्धन समिती मिळेल, असे बोलले जात आहे. मात्र निकालात राष्ट्रवादीच्या बाजूने अपेक्षित निकाल लागले नाही तर मात्र वेळेवर समित्यांचे वाटप करताना बदल होऊ शकतो. एका गटनेत्याने तर समिती वाटपाबाबत सभेत मतदानच होईल, असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच भाजपाला जिल्ह्णात चांगला प्रतिसाद मिळाला आणि सरकार स्थापनेसाठी भाजपा प्रबळ दावेदार असला, तर त्याचे पडसादही जिल्हा परिषदेपर्यंत उमटण्याची शक्यता असून, तसे झाले तर महत्त्वाचे बांधकाम व अर्थ खाते मिळविण्यासाठी केदा अहेर फिल्डिंग लावू शकतात. अद्यापपर्यंत मात्र कोणाला कोणते खाते मिळणार याबाबत रहस्य कायम असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)