सटाणा : येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आला.राज्य शासनाने विक्रत्या उपजीविका संरक्षण व पथविक्र विनयन योजना मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने सटाणा नगरपरिषद क्षेत्रातील स्थिर, फिरते व तात्पुरत्या फेरीवाल्यांचे मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील पथ विक्रता मोबाईलद्वारे आॅनलाइन सर्वेक्षण केले जाणार आहे. याकरिता पालिका हद्दीतील असा व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक व विनापरवानाधारक फेरीवाले व्यवसायिकांनी आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पुस्तक, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच आदिवासी, विधवा असलेल्यांनी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमाती इत्यादीमध्ये समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, व्यवसाय धारक व व्यवसायाचा फोटो आदि कागदपत्रांच्या प्रती मोबाईल अॅपमध्ये सर्वेक्षण करताना जवळ ठेवाव्यात,असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सर्व सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्येक पथविक्रत्यास ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. विक्रत्यांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी हेमलता हिले-डगळे यांनी केले.
सटाण्यातील फेरीवाल्यांचे आॅनलाइन सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 18:38 IST
पालिकेचा उपक्रम : पथविक्रेत्यास मिळणार ओळखपत्र
सटाण्यातील फेरीवाल्यांचे आॅनलाइन सर्वेक्षण
ठळक मुद्देविशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आला.