शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन अभ्यास ग्रामीण भागात डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:51 IST

लखमापूर : कोरोनाने देशाच्या प्रत्येक ठिकाणी त्यात शहरी व ग्रामीण भागातही आता रुग्ण सापडत असल्यामुळे शासनाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅनलाइन अभ्यास प्रणाली अवलंबिली, या योजनेस शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु ग्रामीण भागात प्रत्येक पालकाकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाला आॅनलाइन अभ्यासाला मुकावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला ही योजना डोकेदुखी वाटत आहे.

ठळक मुद्देलखमापूर : पालकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्याने विद्यार्थीवर्गाचे नुकसान

लखमापूर : कोरोनाने देशाच्या प्रत्येक ठिकाणी त्यात शहरी व ग्रामीण भागातही आता रुग्ण सापडत असल्यामुळे शासनाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅनलाइन अभ्यास प्रणाली अवलंबिली, या योजनेस शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु ग्रामीण भागात प्रत्येक पालकाकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाला आॅनलाइन अभ्यासाला मुकावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला ही योजना डोकेदुखी वाटत आहे.शहरी भागात जवळ जवळ ८० ते ९० टक्के पालकवर्ग हा नोकरी करीत असतो, त्यामुळे आॅनलाइन अभ्यास शहरी भागातील विद्यार्थी वर्गास चांगला समजतो, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाजवळ अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल राहत नसल्यामुळे आॅनलाइन अभ्यास गरीब विद्यार्थ्यांना समजायला कठीण जात आहे. कारण ग्रामीण भागातील जवळ जवळ ३० ते ४० टक्के पालक हे अशिक्षित असल्यामुळे ते आपल्या मुलांना आॅनलाइन अभ्यास सांगण्यासाठी असमर्थ ठरत आहे.जर काहींना समजले तर गावात मोबाइल नेटवर्कमध्ये कायमस्वरूपी समस्या येत असतात. दिंडोरी तालुक्यातील काही भाग अतिशय डोंगराळ असून, त्याठिकाणी नेटवर्कमध्ये कायमस्वरू पी समस्या येत असतात. त्यामुळे या भागात आॅनलाइन अभ्यास प्रणाली पद्धती विद्यार्थी वर्गापर्यंत कशी पोहोचणार? त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील डोंगराळ भागातील पालक वर्ग या पध्दतीवर नाराज असल्याने यंदा आपल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय याची भिती पालक वर्गामध्ये निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गास आजही २ ते ३ किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करून शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच मोलमजुरी करून आपल्या मुलांचे शिक्षण ग्रामीण भागातील पालक वर्ग करतो, परंतु कोरोनामुळे सध्या सर्व विद्यार्थी वर्ग घरीच बसवुन आहे. परंतु बरीच विद्यार्थी वर्गास आॅनलाईन अभ्यास प्रणाली समजत नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग नाराज वाटत आहे.सध्या ग्रामीण भागातील पालक वर्ग कोरोनाचे रु ग्ण कधी कमी तर कधी जास्त हे चित्र पाहात असल्या कारणाने आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार होत नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट व दुसरीकडे विद्यार्थी वर्गाची आॅनलाईन अभ्यास प्रणाली हे समीकरण ग्रामीण भागातील पालक वर्गाला समजत नसल्यामुळे पालक वर्गा संभ्रमावस्थेत आहे.कोट...आम्ही जेमतेम शालेय शिक्षण घेतले आहे. तेव्हा हे असे शिक्षण नव्हते, परंतु आता मात्र सर्व नवनवीन शिक्षणप्रणाली पद्धती आल्याने आम्हाला याचे ज्ञान नाही. आता कोरोनामुळे आमची मुलं घरी बसून आहेत. शासनाने आॅनलाइन अभ्यासप्रणाली पद्धत सांगितली. हे आम्हाला समजत नसल्यामुळे यंदा आमच्या मुलांचे शैक्षणिकवर्ष वाया जाते की काय, याची भीती वाटत आहे.- एक पालक.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण