आॅनलाइन अभ्यास ग्रामीण भागात डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:49 PM2020-06-23T16:49:30+5:302020-06-23T16:51:12+5:30

लखमापूर : कोरोनाने देशाच्या प्रत्येक ठिकाणी त्यात शहरी व ग्रामीण भागातही आता रुग्ण सापडत असल्यामुळे शासनाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅनलाइन अभ्यास प्रणाली अवलंबिली, या योजनेस शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु ग्रामीण भागात प्रत्येक पालकाकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाला आॅनलाइन अभ्यासाला मुकावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला ही योजना डोकेदुखी वाटत आहे.

Online study headaches in rural areas | आॅनलाइन अभ्यास ग्रामीण भागात डोकेदुखी

आॅनलाइन अभ्यास ग्रामीण भागात डोकेदुखी

Next
ठळक मुद्देलखमापूर : पालकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्याने विद्यार्थीवर्गाचे नुकसान

लखमापूर : कोरोनाने देशाच्या प्रत्येक ठिकाणी त्यात शहरी व ग्रामीण भागातही आता रुग्ण सापडत असल्यामुळे शासनाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅनलाइन अभ्यास प्रणाली अवलंबिली, या योजनेस शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु ग्रामीण भागात प्रत्येक पालकाकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाला आॅनलाइन अभ्यासाला मुकावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला ही योजना डोकेदुखी वाटत आहे.
शहरी भागात जवळ जवळ ८० ते ९० टक्के पालकवर्ग हा नोकरी करीत असतो, त्यामुळे आॅनलाइन अभ्यास शहरी भागातील विद्यार्थी वर्गास चांगला समजतो, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाजवळ अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल राहत नसल्यामुळे आॅनलाइन अभ्यास गरीब विद्यार्थ्यांना समजायला कठीण जात आहे. कारण ग्रामीण भागातील जवळ जवळ ३० ते ४० टक्के पालक हे अशिक्षित असल्यामुळे ते आपल्या मुलांना आॅनलाइन अभ्यास सांगण्यासाठी असमर्थ ठरत आहे.
जर काहींना समजले तर गावात मोबाइल नेटवर्कमध्ये कायमस्वरूपी समस्या येत असतात. दिंडोरी तालुक्यातील काही भाग अतिशय डोंगराळ असून, त्याठिकाणी नेटवर्कमध्ये कायमस्वरू पी समस्या येत असतात. त्यामुळे या भागात आॅनलाइन अभ्यास प्रणाली पद्धती विद्यार्थी वर्गापर्यंत कशी पोहोचणार? त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील डोंगराळ भागातील पालक वर्ग या पध्दतीवर नाराज असल्याने यंदा आपल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय याची भिती पालक वर्गामध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गास आजही २ ते ३ किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करून शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच मोलमजुरी करून आपल्या मुलांचे शिक्षण ग्रामीण भागातील पालक वर्ग करतो, परंतु कोरोनामुळे सध्या सर्व विद्यार्थी वर्ग घरीच बसवुन आहे. परंतु बरीच विद्यार्थी वर्गास आॅनलाईन अभ्यास प्रणाली समजत नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग नाराज वाटत आहे.
सध्या ग्रामीण भागातील पालक वर्ग कोरोनाचे रु ग्ण कधी कमी तर कधी जास्त हे चित्र पाहात असल्या कारणाने आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार होत नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट व दुसरीकडे विद्यार्थी वर्गाची आॅनलाईन अभ्यास प्रणाली हे समीकरण ग्रामीण भागातील पालक वर्गाला समजत नसल्यामुळे पालक वर्गा संभ्रमावस्थेत आहे.
कोट...
आम्ही जेमतेम शालेय शिक्षण घेतले आहे. तेव्हा हे असे शिक्षण नव्हते, परंतु आता मात्र सर्व नवनवीन शिक्षणप्रणाली पद्धती आल्याने आम्हाला याचे ज्ञान नाही. आता कोरोनामुळे आमची मुलं घरी बसून आहेत. शासनाने आॅनलाइन अभ्यासप्रणाली पद्धत सांगितली. हे आम्हाला समजत नसल्यामुळे यंदा आमच्या मुलांचे शैक्षणिकवर्ष वाया जाते की काय, याची भीती वाटत आहे.
- एक पालक.

Web Title: Online study headaches in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.