पंचवटीत ऑनलाइन, ऑफलाइन लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST2021-06-23T04:11:04+5:302021-06-23T04:11:04+5:30
पंचवटीत असलेल्या आठ लसीकरण केंद्रांत नागरिकांना लस उपलब्ध असून, सर्व केंद्र मिळून जवळपास दोन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात ...

पंचवटीत ऑनलाइन, ऑफलाइन लसीकरण
पंचवटीत असलेल्या आठ लसीकरण केंद्रांत नागरिकांना लस उपलब्ध असून, सर्व केंद्र मिळून जवळपास दोन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असल्याने ५० टक्के ऑनलाइन, तर ५० टक्के प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करावी लागते. पंचवटीत इंदिरा गांधी, मायको रुग्णालय, हिरावाडी, तपोवन, मखमलाबाद, म्हसरूळ, रेडक्रॉस, नांदूर आदी केंद्रांवर लसीकरण केले जाते. सध्या या केंद्रांवर ३० वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे, तर नागरिक मोकळ्या मनाने लसीकरण करण्यासाठी येतात असे नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी सांगितले.
प्रत्येक केंद्रावर दैनंदिन लस साठा उपलब्ध होतो त्यानुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे. लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांना अँटिजन चाचणी करणे बंधनकारक केले आहे त्यामुळे केंद्रावर गर्दी कमी होत आहे.