शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नाशकात १ जूलैपासून नववी, दहावी, बारावीचे ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:04 IST

लाकॅडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील एचपीटी,आरवायके, बीवायके सारख्या महाविद्यालयांमध्ये १२ वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून १ जूलैपासून नियमितपणे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबारावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ७० ते ८० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुरूच राहणार

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लाकॅडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळामहाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील एचपीटी,आरवायके, बीवायके सारख्या महाविद्यालयांमध्ये १२ वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून १ जूलैपासून नियमितपणे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध शिक्षण सस्थांकडून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली असून जवळपास ७० ते ८० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रि या सुरूच राहणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्रशासनांकडून सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी शिक्षण विभागाकडे संकलित स्वरुपाची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यानेच समोर आले आहे. जुलैपासून शक्य त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याच्या सुचना सरकारने दिल्या आहेत. हे आदेश तसेच्या तसे पुढे पाठविण्यापलिकडे शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. शहरासह जिल्हयातील किती महाविद्यालयांध्ये बारावीसाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली, किती शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची तयारी करण्यात आली आणि किती विद्यार्थी प्रत्यक्ष ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होणार आहेत याविषयी माध्यमिक शिक्षण विभाग अनभिज्ञ असल्याने स्थानिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी शासनाकडून येणारे आदेश पुढे पाठविणारे टपालखाते बनले आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन गोखले एज्युकेशन संस्थेच्या शहरी भागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या प्रवेशप्रक्रिया दि. १० ते ३० जून २०२० या कालावधीत राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे १ जुलैपासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविण्याची पूर्वतयारी संस्थेने केली असल्याची माहिती संस्थेच्या मानव संसाधन संचालक  प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी दिली.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी