२१ हजार विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज
By Admin | Updated: June 10, 2017 01:26 IST2017-06-10T01:25:59+5:302017-06-10T01:26:07+5:30
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी या वर्षापासून प्रथमच आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

२१ हजार विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी या वर्षापासून प्रथमच आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, आतापर्यंत शहरातील २२ हजार ५०० विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली असून, त्यापैकी २१ हजार २०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत, तर १२ हजार ७०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जांची पडताळणी करून प्रवेशप्रक्रियेचा भाग एक पूर्ण के ला आहे.
दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या काही दिवस आधीच आॅनलाइन प्रवेशासाठी भाग एक अंतर्गत प्राथमिक नोंदणी प्रक्रि या सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर होईपर्यंत शाळा विभागनिहाय मार्गदर्शन केंद्रातून नोंदणी करता येणार आहे. आॅॅनलाइन अर्ज न करणाऱ्यांना प्रवेशप्रक्रि येत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे विहित मुदतीत आॅनलाइन अर्ज करून मुख्याध्यापकांची मान्यता घेत प्रवेश अर्जाची प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फेकरण्यात आले
आहे.
दहावीच्या निकालानंतर भाग दोन अंतर्गत पुढील चार फेऱ्यांद्वारे प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल. तसेच, सीबीएसई आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी शहराबाहेरील विद्यार्थ्यांसाठी शहरात विविध ठिकाणी मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात आले आहे, तर सीबीएसीच्या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना त्यांचे गुणोत्तर प्रमाण ठरविण्यासाठी सिम्बॉयसीस स्कूलमध्ये केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.