आॅनलाईन पद्धतीने उपक्र माचे वैनतेय विद्यालयात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:44 PM2020-10-02T15:44:38+5:302020-10-02T15:44:38+5:30

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी आॅन लाईन पद्धतीने विविध उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

Online activities are organized at Vantay Vidyalaya | आॅनलाईन पद्धतीने उपक्र माचे वैनतेय विद्यालयात आयोजन

आॅनलाईन पद्धतीने उपक्र माचे वैनतेय विद्यालयात आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्देवैष्णव जन तो तेने कहीये, हे भजन आॅडिओद्वारे पोहचवले.

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी आॅन लाईन पद्धतीने विविध उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या साडेसहा महिन्यापासून विद्यार्थ्यांंना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. २ आक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त सर्व ५ वी ते १० वीच्या सर्व वर्गाच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संगीत शिक्षिका श्रीमती योगिता निगळ यांनी गायलेले वैष्णव जन तो तेने कहीये, हे भजन आॅडिओद्वारे पोहचवले. विशेष म्हणजे हे भजन विद्यालयाच्या हे भजन सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी म्हणावे असे आवाहन करण्यात आले होते.
तसेच महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर माहिती लिहावी या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना एक उपक्र म देण्यात आला. त्याला ही चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Online activities are organized at Vantay Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.