बाजारात कांदा स्वस्त तर बटाटा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:16 PM2020-01-30T18:16:30+5:302020-01-30T18:16:34+5:30

येवला : कांदा दराने मेटाकुटीस आणले असतानाच बटाट्याच्या वाढत्या दराने गृहिणींच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडू लागले आहे. जुन्या बटाट्याचे दर ३५ ते ४० रु पये, तर नव्या बटाट्याचे दर २५ ते ३० रु पयांपर्यंत पोहोचले आहेत.

Onions are cheap in the market and potatoes are expensive | बाजारात कांदा स्वस्त तर बटाटा महागला

बाजारात कांदा स्वस्त तर बटाटा महागला

Next
ठळक मुद्देजुन्या बटाट्याचे दर ३५ ते ४० रु पये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क
येवला : कांदा दराने मेटाकुटीस आणले असतानाच बटाट्याच्या वाढत्या दराने गृहिणींच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडू लागले आहे. जुन्या बटाट्याचे दर ३५ ते ४० रु पये, तर नव्या बटाट्याचे दर २५ ते ३० रु पयांपर्यंत पोहोचले आहेत.
नववर्ष सर्वसामान्यांना महागाईचे चटके देणारे ठरत असून, तेल, गॅस, इंधन, डाळी, ज्वारी, बाजरी या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली असतानाच आता बटाटाही महागला आहे.
कांदा दर थोडे आवाक्यात येत नाही तोच बटाट्याच्या दरातही झालेली वाढ सर्वसामान्यांना त्याकडे पाठ फिरवायला लावणारी ठरत आहे. जुन्या बटाट्याचे दर ३५ ते ४० रु पये किलोपर्यंत पोहोचले आहेत. नवीन बटाटा बाजारात दाखल झाला असला तरी त्याचे दरही किलोला २५ ते ३० रु पये आहेत. यामुळे आता जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गृहिणींना हात आखडता घ्यावा लागत आहे.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात सर्वाधिक बटाटा उत्पादन होते. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील तळेगावसह इतर अनेक जिल्ह्यात बटाट्याचे उत्पादन होते. रब्बी हंगामातील आॅक्टोबर महिन्यात लागवड झालेला बटाटा बाजारात दाखल होण्यास सुरु वात झाली आहे. मात्र गेल्या महिन्याच्या तुलनेत आवक कमी आहे. यामुळे दरवाढ झाली आहे.
 

Web Title: Onions are cheap in the market and potatoes are expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.