शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय, राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप

By संकेत शुक्ला | Updated: July 27, 2024 18:31 IST

नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.

नाशिक : भारतीय कांद्याला जगभरात मोठी बाजारपेठ आहे. आजही निर्यातीसाठी ५ लाख कांद्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठाही आहे. परंतु व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की कांद्याच्या दराबाबतच शेतकरी आणि व्यापारी असे दोन मतप्रवाह आहेत. ते शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहे. निर्यातीसाठी कांदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. निर्यातमूल्य कमी करण्यासाठी पीयूष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टिकेविषयी विचारले असता पवार सध्या वैफल्यग्रस्त आहेत. ज्येष्ठ नेत्याने अशी टीका करू नये. बॉम्बस्फोटातील आरोपी समवेत त्यांनी केलेला विमान प्रवास सगळ्यांनाच ज्ञात आहे. परंतु आता अशा टीका करणे योग्य नाही. त्यांनीही याची जाण ठेवायला हवी अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली. लोकसभेला वेगळे चित्र होते, आता विधानसभेत वेगळे असेल, राज्यात नक्कीच महायुतीचे सरकार येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण साठी निधीची कमतरता नाहीराज्य शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना सादर करण्यापूर्वी अर्थ खात्याशी संवाद साधला नाही, या योजनेसाठी पैसे नाहीत अशा चर्चा सुरू असताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी मात्र त्याचा साफ इन्कार केला आहे. राज्य शासनाकडे पुरेसा पैसा आहे. निधीची कोणतीही चिंता नाही. ठरवल्यानुसार बहिणींच्या खात्यात रक्कम नक्कीच येईल असा दावाही त्यांनी केला.

शरद पवारांवर टीकाशरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.त्या काळात त्यांनी काय केलेले हे सर्वांना माहीत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केले हे त्यांनी सांगावे. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची हाच त्यांचा आजवरचा उद्योग असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलonionकांदाNashikनाशिक