चाळीतील कांद्यापाठोपाठ जाळीतील साठवलेला कांदाही सडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:25+5:302021-09-21T04:15:25+5:30

चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीपासूनच कांदा बियाण्यांची कमतरता, कंपन्यांकडून फसवणूक, त्यानंतर अवकाळी पाऊस व करपा रोगाचे थैमान तसेच ...

The onion stored in the net along with the onion in the chali also rotted | चाळीतील कांद्यापाठोपाठ जाळीतील साठवलेला कांदाही सडला

चाळीतील कांद्यापाठोपाठ जाळीतील साठवलेला कांदाही सडला

चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीपासूनच कांदा बियाण्यांची कमतरता, कंपन्यांकडून फसवणूक, त्यानंतर अवकाळी पाऊस व करपा रोगाचे थैमान तसेच शेवटी विहिरींनीही तळ गाठल्याने कांदा उत्पादनात काही अंशी घट आली. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कांद्यांचे बाजारभाव तेजीत राहतील या अपेक्षेपोटी बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणूक करतेवेळी १,२०० ते १,४०० रुपयांपर्यंत बाजारभाव असतानाही चाळी भरल्या होत्या. चाळी भरल्यानंतर अवघ्या महिन्या-दोन महिन्यातच कांद्याचे दर २ हजार ते २,५०० रुपयांपर्यंत वाढले होते. परंतु शेतकऱ्यांच्या चाळी नुकत्याच भरल्या होत्या. शिवाय बाजारभावात लवकरच तेजी आल्याने आगामी काळात कांद्याचे बाजारभाव याहून अधिक वाढतील असा अंदाज शेतकरी, व्यापारी व साठवणूकदारांकडून बांधण्यात आला होता. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा विकला नाही. तर दुसरीकडे आपल्याकडे अधिक कांदा असावा या अपेक्षेपोटी काही भांडवलदार व्यापाऱ्यांनी तसेच नाफेडच्या कृषी प्रोड्युसर कंपन्यांनी १,८०० ते २,२०० रुपये क्विंटल दराने बाजारातून कांदा माल खरेदी केला. हा माल साठवणूक करण्यासाठी चाळी शिल्लक नसल्याने तार जाळींचा (कंडे) उपयोग करून लाखो क्विंटल माल या जाळींमध्ये साठवणूक केला. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच बाजारभावात घसरण सुरू झाल्याने निदान भांडवल तरी निघावे यासाठी किमान २,५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. असे असतानाच दुसरीकडे कांदे साठवणुकीला जास्त दिवस झाल्याने शेतकऱ्यांनी चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यांसह व्यापाऱ्यांनी व नाफेडने साठवणूक केलेला जाळीतील कांदाही सडल्याने आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर व व्यापाऱ्यांवर आली आहे.

---------------------------------

चालू वर्षी कांदा पिकावर सुरुवातीला करपा रोगाने थैमान घातले होते. तसेच काढणीच्या वेळेला अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने कांदा पीक बाधित झाले होते. त्यामुळे बाधित झालेला कांदा वातावरणातील बदलामुळे चाळीत व जाळीत जास्त दिवस टिकणार नसल्याचा अंदाज असतानाही भाववाढीच्या अपेक्षेने आर्थिक नुकसान सोवावे लागत असल्याचे बहुतांशी शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.

---------------------------

तार जाळीत (कंड्यात) साठवणूक केलेला कांदा सडल्याने झालेले नुकसान. (२० उमराणे कांदा)

200921\20nsk_24_20092021_13.jpg

२० उमराणे कांदा

Web Title: The onion stored in the net along with the onion in the chali also rotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.