शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : महायुती की मविआ.... कोण मारणार बाजी?; लवकरच मतमोजणीला सुरुवात
2
Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल
3
Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल
4
कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?
5
खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी
6
७ वर्षांनी ‘या’ ग्रहाचे गोचर: ७ राशींना अनुकूल, अचानक मोठा फायदा-प्रगती; उत्पन्नात वाढ, लाभ!
7
मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड
8
फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा
9
उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश
10
अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला अखेर स्थगिती, राज्य सरकारने दिले होते आव्हान
11
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
12
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
13
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
14
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
15
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
16
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
17
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
18
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
19
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
20
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

चाळीतून कांदा थेट उकीरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 4:51 PM

भाव कवडीमोल : वाहतूक खर्चही परवडत नसल्याने शेतकरी हवालदिल

ठळक मुद्देपोळ कांद्याची आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याचे देखील बाजार भाव कोसळले आहेत

देवळा : उन्हाळी कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतांनाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकीरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.देवळा तालुक्यातील अनेक शेतक-यांनी चाळीतील कांदा उकीरड्यावर टाकून दिला आहे. पोळ कांद्याची आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याचे देखील बाजार भाव कोसळले आहेत, यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांच्या मागे लागलेली साडेसाती संपायचे नाव घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीतील उन्हाळी कांद्याचे जागेवर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व पोळ कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत गतवर्षी उन्हाळी कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्यानंतर चांगला भाव मिळेल या मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतक-यांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. शासनाने नवीन कांदा चाळी बांधण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, त्यासाठी दिलेले अनुदान याचा सकारात्मक परिणाम होऊन बहुसंख्य शेतक-यांनी हयाचा लाभ घेत नवीन चाळी तयार केल्या. यामुळे थोडेफार अपवाद सोडले तर प्रत्येक शेतक-याकडे स्वत:ची कांदा चाळ तयार झाली. यामुळे सर्व शेतक-यांनी कांदा चाळीत साठवणुक करण्यावर भर दिला.परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यातच सोशल मिडियावर कांद्याच्या बाजार भावासंदर्भात दररोज येणा-या वेगवेगळ्या पोस्टमुळे शेतक-यांच्या अपेक्षा वाढून तर संभ्रम अधिकच वाढला. अनेक शेतक-यांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता आला नाही. ज्या शेतक-यांकडे कांदा साठवणुक करण्याची सोय नव्हती त्यांचाच कांदा बाजारात विक्रि साठी येत होता. यामुळे त्याकाळात बाजारात कांद्याची आवक देखील कमी झाली. परंतु बाजार काही वधारले नाहीत. मिळेल त्या भावात कांदा विकण्याची वेळ शेतक-यांवर आली. त्यातच नवीन पोळ कांद्याचे बाजारात झालेल्या दमदार आगमनाचा उन्हाळी कांद्याला फटका बसला.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा