नांदूरशिंगोटेत कांद्याची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:19 IST2020-02-22T23:44:01+5:302020-02-23T00:19:09+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजार आवारात महिनाभरात दुसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली होती. शुक्रवारी ...

नांदूरशिंगोटेत कांद्याची विक्रमी आवक
नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजार आवारात महिनाभरात दुसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली होती. शुक्रवारी (दि. २१) १३ हजार ४३० क्विंटल आवक होती. वर्षभराच्या तुलनेत येथे यावर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कांद्यास प्रतिक्विंटल सरासरी २००० हजार रुपयांच्या आसपास दर मिळाला.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदूरशिंगोटे व दोडी येथे उपबाजार आवार आहे. नांदूरशिंगोटे येथे आठवड्यातून सोमवार व शुक्रवार तर दोडीला बुधवारी कांदा विक्री लिलाव असतो. गेल्या दोन महिन्यांपासून दोन्हीही ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती.
येथील उपबाजारात कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट मिळत असल्याने शेतकºयांची येथे पसंती आहे. गेल्या महिन्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नांदूर उपबाजारात अकरा हजार क्विंटलची आवक झाली होती.
बाजारभाव टिकून राहिल्याने शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. दोडी बुद्रुक उपबाजारात बुधवारी (दि. १९) आठ हजार आठशे नव्वद क्विंंटल आवक होती. कांद्यास सरासरी २००० हजार, जास्तीत जास्त २६५१ व कमीत कमी २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची
माहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, सचिव विजय विखे, उपसचिव पी. आर. जाधव यांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसांपासून नांदूरशिंगोटे व दोडी येथे कांदा लिलाव दुपारी ४ वाजता सुरू होत असल्याने लिलाव सुरळीत पार पडत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना लवकर घरी जाण्यास मिळत आहे. आज येथे २४ हजार ३९५ च्या आसपास कांदा गोणी म्हणजे १३ हजार ४३० क्विंटल आवक होती.