कांद्याचे उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:06 IST2017-09-02T00:06:24+5:302017-09-02T00:06:42+5:30
तालुक्यात सध्या कांद्याची लागवड सुरू असून, रिमझिम पावसावर शेतकरी पुन्हा कांदा पिकाकडे आशेने बघत आहे. सर्वत्र मोठे धुके पडत असून, कांद्याच्या लागवडीसह शेतात तयार असलेले रोपदेखील किडीच्या बळी पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने रिमझिम पावसाने काही प्रमाणात तारले आणि धुक्याने मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कांद्याचे उत्पादन घटणार
येवला : तालुक्यात सध्या कांद्याची लागवड सुरू असून, रिमझिम पावसावर शेतकरी पुन्हा कांदा पिकाकडे आशेने बघत आहे. सर्वत्र मोठे धुके पडत असून, कांद्याच्या लागवडीसह शेतात तयार असलेले रोपदेखील किडीच्या बळी पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने रिमझिम पावसाने काही प्रमाणात तारले आणि धुक्याने मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धुके आणखी काही दिवस पडले तर पोळ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय पोळ कांद्याची लागवड आता सुरू झाली आहे. उशिराने रिमझिम पावसात आगामी बेभरवश्यावर शेतकरी पुन्हा एकदा कांद्याची लॉटरी खेळणार आहे.
सध्या कांद्याला १७०० ते १८०० रुपये क्विंटल सरासरी भाव मिळत आहे. नैसर्गिक परिस्थिती काही दिवस अशीच राहिली तर आगामी पोळ कांदा बाजारात येण्यास डिसेंबर येण्याची वाट पहावी लागेल.