शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कांदा दरात उसळी, उत्पादकांना दिलासा; नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार ८०० रुपये दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 09:47 IST

लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत मिळाला होता.

नाशिक : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. सोमवारी लिलावाची प्रक्रिया नियमित सुरू झाल्यानंतर कांदा दराने विक्रमी उसळी घेत लासलगावी ६ हजार ८९१ रुपये तर पिंपळगाव बसवंत येथे ७ हजार ९७१ रूपये इतका दर मिळाला. जिल्ह्यातील अभोणा येथील उपकेंद्रावर सर्वाधिक ८ हजार ८०० रूपये दर मिळाला.

लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत मिळाला होता. उन्हाळ कांद्यालाही चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे १३० टक्के इतके उत्पादन निघाले होते.

सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने कांद्याचे भाव दररोज वाढत आहे. अभोणा केंद्रावर ८ हजार ८०० रूपये, वणी केंद्रावर ८ हजार ७०१ तर कळवण केंद्रावर ८ हजार ५०५ रुपये दर मिळाला. आता केंद्र सरकारने कांदा आयात करू नये अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :onionकांदाNashikनाशिकFarmerशेतकरी