Onion prices fall at Lasalgaon | लासलगाव येथे कांदा दरात घसरण
लासलगाव येथे कांदा दरात घसरण

लासलगाव : येथील बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा आवक कमी झाली असूनही सोमवारी सकाळी दरात ४५० रुपयांची घसरण झाली. व्यापाऱ्यांकडील कांदा साठ्यावर मर्यादा असल्याने त्यांनी सावध खरेदी केल्याने भावात घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळी २३० वाहनांमधून कांदा आवक झाली. दर किमान १२०० ते कमाल ३०१३ व सरासरी २६०० रुपये होते. दररोज घसरण होत शुक्रवारी ३९०० रुपये क्विंटल कांदा किमान १२०० ते कमाल ३४५२ व सरासरी ३००० रुपये दराने विक्री झाला. साधारण आठवडाभरात चारशे दर घसरले. त्यामुळे अजून दर कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारी व रविवारी (दि. १२ व १३) साप्ताहिक सुट्टी असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद होते. आता दिवाळीला खर्चाची गरज म्हणून येत्या आठवड्यात आवक वाढेल, असे दिसते. त्यात कमी दर जाहीर झाले तर दिवाळी कशी करणार? कांदा उत्पादकांना याची चिंता भेडसावत आहे. दिवाळीनंतरच कांदा निर्यातबंदी उठवण्याचा फेरविचार सरकार करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कांदा दराची पातळी वाढण्याची शक्यता दुरावली आहे.
कांदा आवक केवळ ४१० वाहनांची झाली असून, बाजारभाव प्रतिक्विंटल किमान १२०१ ते
कमाल ३८२५, तर सरासरी ३४०० रुपये होते.


Web Title: Onion prices fall at Lasalgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.