लासलगाव येथे कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:24 IST2020-01-27T23:37:47+5:302020-01-28T00:24:42+5:30
गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यात आवक वाढल्याने तसेच महाराष्ट्रातही मुबलक आवक झाल्याने गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दरात ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

लासलगाव येथे कांदा दरात घसरण
लासलगाव : गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यात आवक वाढल्याने तसेच महाराष्ट्रातही मुबलक आवक झाल्याने गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दरात ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.
लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत सोमवारी (दि.२७) दुपारपर्यंत १६००, तर विंचूर येथील कांदा उप आवारावर १५०० वाहनातील कांदा विक्र ीस आला. तीन दिवस कांदा लिलाव सुट्टी असल्याने बंद होते. परिणामी बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी १५७५ वाहनातील १५५६० क्विंटल लाल कांदा किमान ११५० ते कमाल २७७१, तर २५०० रु पये सरासरी दराने विक्र ी झाला, तर गत सप्ताहात लाल कांद्याची ८८ हजार ८५६ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान
रु पये १२५१ कमाल रु पये ४ हजार ८५५, तर सर्वसाधारण रु पये ३ हजार ७६३ प्रतिक्विंटल राहिले होते.