लासलगांव बाजार समितीत कांदा भाव २४११
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 19:01 IST2020-09-03T18:58:44+5:302020-09-03T19:01:19+5:30
लासलगांव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाचा कांद्याला मागणी वाढल्याने गुरूवारी (दि.३) लासलगाव येथील बाजारात कांदा भावात तेजी होत २४६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रूपये प्रति क्विंटल भावाने झाला.

लासलगांव बाजार समितीत कांदा भाव २४११
ठळक मुद्देगत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६९,७२० क्विंटल आवक
लासलगांव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाचा कांद्याला मागणी वाढल्याने गुरूवारी (दि.३) लासलगाव येथील बाजारातकांदा भावात तेजी होत २४६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रूपये प्रति क्विंटल भावाने झाला. लासलगाव येथील बाजारात प्रथम क्र मांकाचा कांदा विक्र ीस कमी येत आहे.
३१ आॅगस्ट रोजी लासलगाव बाजार समितीत ७८०० क्विंटल कांदा लिलाव ५०१ ते १९३१ व सरासरी १६५० रूपये भावाने झाला.
गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६९,७२० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ५०१ कमाल रु पये १,८७४ तर सर्वसाधारण रु पये १,४९२ प्रती क्विंटल राहीले.