कळवण बाजार समितीत कांद्याला विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 14:06 IST2019-11-22T14:06:12+5:302019-11-22T14:06:48+5:30
कळवण/वणी : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला ८५०० रूपये हंगामातील सर्वाधिक भाव मिळाला तर वणी येथील उपबाजार आवारात सर्वाधिक ७९५० रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

कळवण बाजार समितीत कांद्याला विक्रमी भाव
कळवण/वणी : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला ८५०० रूपये हंगामातील सर्वाधिक भाव मिळाला तर वणी येथील उपबाजार आवारात सर्वाधिक ७९५० रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. २८ वाहनामधुन ५५० क्विंटल कांदा आवक झाली. ७९५० रु पये कमाल, ६५०० किमान तर ७५७५ रु पये प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला. निर्यातबंदी होऊन कांद्याचे दर नियंत्रणात येईल असे धोरण सरकारचे होते मात्र अतिवृष्टीमुळे नविन कांद्याचे झालेले मोठे नुकसान त्यामुळे त्या उत्पादनावर झालेला प्रतिकुल परिणाम दरवाढीवर झाला आहे. तसेच देशांतर्गत नाशिक जिल्ह्याच्या कांद्याला सर्वाधिक पसंती असुन देशांतर्गत सातत्याने वाढणारी मागणी दर्जेदार व चविष्ट तसेच मोठ्या आकारमानाच्या कांद्याला आहे. हे सर्व वैशिष्ट्ये नाशिक जिल्ह्यातील कांद्याला असल्याने परराज्यात मागणीतील सातत्य कायम आहे. मोजक्याच उत्पादकांकडे कांदा शिल्लक असल्याने मर्यादित आवक कांद्याची होते आहे. दरम्यान कांदा खरेदी विक्र ी व्यवहारातील तेजीचे वातावरण पाहता अनुकुल व सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान कांदा आयातीचे धोरण सरकारचे असुन देशांतर्गत प्रति दिवसाची कांद्याची गरज व उपलब्धता याचा समन्वय साधणे आव्हानात्मक काम असुन तेजीच्या वातावरण उत्पादकांचा उत्साह वाढविणारा असला तरी साठवणुक केलेला कांदा विक्र ी करण्याच्या वेळेस चाळीबाहेर काढताना कांद्याच्या वजनात मोठी घट येते. त्यामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान होते ही वस्तुस्थिती आहे.