सिन्नर : शेतकऱ्यांच्या कांदा पिकासह अन्य पिकांना हमीभाव मिळावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ क्रांती सेनेने बाजार समितीच्या प्रवेशद्वारात कांदा ओतून आंदोलन केले.महाराष्टÑ क्रांती सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व शेतकºयांनी मोर्चा काढून बाजार समितीच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून युती शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.कांद्याला १५०० रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, कांद्याला ७०० रुपये अनुदान मिळाले पाहिजे आदीसह विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दुष्काळी स्थितीत टॅँकरने पाणी विकत घेऊन शेतकºयांनी कष्टाने कांद्यासह अन्य पिके घेतली. त्यातही शेतकºयांना केवळ निम्मे उत्पादन मिळाले. तथापि, पाणीटंचाई असतानाही सर्व पिकांचे भाव पडले. शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत शासनाने कांद्याला किमान ७०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेतकºयांनी आत्महत्या करू नये यासाठी शासनाने ठोस पावले उचलून कांदा व भाजीपाल्याला हमीभाव देण्याची मागणी महाराष्टÑ क्रांती सेनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी शरद शिंदे यांच्यासह अर्जुन घोरपडे, बाळासाहेब सहाणे, गोपाळ गायकर, गणेश जाधव, कमलाकर शेलार, कैलास दातीर, संदीप गडाख, अर्जुन शेळके, रावसाहेब माळी, रूपेश तेली, शुभम मुरकुटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेशद्वारात कांदे ओतून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:17 IST