कांदा बाजारभावात घसरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:32 IST2019-12-12T23:28:26+5:302019-12-13T00:32:25+5:30
येवल्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे चित्र बुधवारीही बाजार समितीत दिसले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ५० ट्रॅक्टर, ४०० रिक्षा/पिकअपद्वारे गुरुवारी (दि.१२) एकूण ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा किमान २००० रुपये ते कमाल ७६०१ रु पये तर सरासरी ५५०० क्विंटल दराने विकला गेला. कांद्याची आवक वाढू लागल्याने कमालीची घसरण होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.

कांदा बाजारभावात घसरण सुरू
नाशिक : येवल्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे चित्र बुधवारीही बाजार समितीत दिसले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ५० ट्रॅक्टर, ४०० रिक्षा/पिकअपद्वारे गुरुवारी (दि.१२) एकूण ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा किमान २००० रुपये ते कमाल ७६०१ रु पये तर सरासरी ५५०० क्विंटल दराने विकला गेला. कांद्याची आवक वाढू लागल्याने कमालीची घसरण होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.
लासलगावी ८००१ रुपये दर
लासलगाव : येथील बाजार समितीत गुरुवारी ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रुपये दराने विक्री झाला.
बुधवारी ३०० रुपये कमाल दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत तीव्र नाराजी असून, ७०० वाहनांतील ७३२४ क्विंटल लाल कांदा किमान २१०१ ते कमाल ७५०० व सरासरी ६२०१ रुपये दराने विक्री झाला होता. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत ९२०१ क्विंटल लाल कांदा किमान २००० ते कमाल ७८०० व सरासरी ५४०१ रुपये दराने विक्री झाला होता.