शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
3
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
5
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
6
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
7
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
8
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
9
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
10
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
11
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
12
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
13
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
14
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
15
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
16
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
17
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
18
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
19
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
20
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा काढणीसाठी मिळेना मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:19 IST

दुप्पट मजुरीची मागणी : शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

ठळक मुद्देपोषक व निर्भेळ वातावरण यामुळे कांद्याचे पीक भरघोस वाढले. वाढलेली व खोलवर कांद्याची मुळे गेली तर गत चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदापात सुकून गेली आहे.

देशमाने : कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाने शेतकरीवर्ग नैराश्यग्रस्त असताना आता लाल कांदा काढण्यासाठी मजुर मिळत नसल्याने या नवीनच समस्येने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिसरातील अनेक गावांत सध्या लाल कांदा काढणीची लगबग सुरू आहे. मात्र सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा काढणीस कुदळाचा वापर सर्रासपणे करावा लागत आहे. परिणामी मजूर वर्गाचा वेळ व मेहनत अधिक खर्ची पडत आहे. परिणामी, मजुरवर्ग कांदा काढण्यास नकार देत आहे. तयार झालाच तर अधिक पैशाची मागणी करत आहेत.हवामान सतत बदलते असल्याने एरव्ही काढणीस आलेल्या कांद्याने यंदा मात्र चोहोबाजूंनी जेरीस आणले आहे. पोषक व निर्भेळ वातावरण यामुळे कांद्याचे पीक भरघोस वाढले. वाढलेली व खोलवर कांद्याची मुळे गेली तर गत चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदापात सुकून गेली आहे. या कारणास्तव कांदा काढण्यास त्रासदायक ठरत आहे. सदर कामास अधिक वेळ, श्रम लागत असल्याने मजूर वर्ग अधिक पैशांची मागणी करत आहे.आधीच कांद्याच्या अल्प बाजार भावामुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी वर्ग मजुर तुटवड्यामुळे बेजार झाला आहे. अधिकांश शेतकरी तर कुटूंबातील सहान-थोरासह कांद्याची काढणी करताना दिसत आहे.२५ टक्के रक्कम कांदा काढणीसच खर्च प्रतिएकर ७५०० रुपये कांदा काढणीचा प्रचलित भाव असताना, परवडत नाही म्हणून मजुरांनी नकार दिला. कांदा सरासरी ४०० रुपये क्विंटल या दराने विक्री होत आहे. यातील २५ टक्के रक्कम कांदा काढणीसच खर्च होत आहे. अन्य उत्पादन खर्च कांदाविक्रतून निघत नसताना कांद्याचे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.- निखिल दुघड, शेतकरी, देशमाने.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा